रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रेंभोटा येथील सुन असलेल्या डॉ. नयना पाटील ह्या मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षांपासून सेवा देत आहे. कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना डॉ. नयना यांनी ३५० कोरोनाबाधित रूग्णांची सेवा दिल्याबद्दल त्यांचा रेंभोटा ग्रामस्थांच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, खिर्डी बु येथून जवळ असलेल्या रेभोटा तालुका रावेर येथील प्रकाश बंडू पाटील यांची सून डॉ.नयना उमेश पाटील या मुबई येथे प्रसिद्ध अश्या नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहेत. सद्या संपूर्ण जगभर कोरोना या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे थैमान घातला आहे.या परिस्थितीत सुद्धा रेभोटा येथील सून डॉ.सौ नयना पाटील ३५० हुन अधीन कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या मूळगावी रेभोटा येथे सुखरूप परतल्या त्यांच्या या कामगिरीची प्रशंसा सर्व परिसरातून होत आहे.त्यांचा नुकताच ग्रामस्थांच्या वतीने डॉ.नयना पाटील यांचा सत्कार ह.भ.प.गोरख महाराज व त्यांच्या सुविद्य पत्नी मंगला पाटील यांनी साडी, चोळी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी सरपंच उज्वला प्रकाश पाटील, प्रकाश पाटील, संदीप पाटील, राहुल पाटील, भागवत पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ पाटील, मोहन पाटील, मोहन कोळी, सुनील पाटील, ह.भ.प.समाधान महाराज, ह.भ.प.गणेश महाराज, राजू महाजन, चावदस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.