रूख्मिनी नगर घरफोडीतील पाच जणांना अटक

crime bedya

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रूख्मिनी नगरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अटक केली असून पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, धनंजय अशोक सोनवणे (वय-३१) रा. रूख्मिनी नगर, जळगाव यांच्या घरात ३ फेब्रुवारी २०२०रोजी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घ्ज्ञरातील सोने, चांदीसह रोख रक्कम सह ३ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२१) रा.सप्तश्रृंगी मंदीराजवळ रामेश्वर कॉलनी याला अटक केली. त्याची कसुन चौकशी केली असता इतर चार जण असल्याची कबुली दिली. यात गुरूजीसिंग सुजानसिंग बावरी (वय-२१) रा. शिरसोली नाका तांबापुरा, विशाल संतोष भोई (वय-१८) रा. बैठक हॉल जवळ रामेश्वर कॉलनी, राहुल नवल काकडे (वय-२०) रा. समता नगर, जळगाव आणि गिरीष अशोक जाधव (वय – २८) रा. खुपचंद साहित्या अपार्टमेंट मोहाडी रोड यांना ६ फेब्रुवारी २०२० रोजी अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागीने सराफ बाजारातील वर्षा ज्वेलर्स दुकान मालक दिलीप सुरेश वर्मा यांना विकले होते. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ज्वेलर्स मालकाकडून विकलेले दागीने हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

<p>Protected Content</p>