मुंबई : वृत्तसंस्था । मुंबईत सध्या कोरोनाचे ८,९९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांना सहव्याधी होत्या. त्यांचे वयही ६०च्य पुढे होते. मुंबईत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असली, तरी मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे
. काल मुंबईत १,१४५ करोना रुग्णांची नोंद झाली. त्याआधी बुधवारी १,१६७ करोना रुग्णांची नोंद झाली होती. ११९ दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत २१ लाख २९ हजार ८२१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ५१,९९३ रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे रुग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस झाला आहे. १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान रुग्णवाढीचे प्रमाण ०.२५ टक्के आहे. ही रुग्णवाढ होतेय, त्याचा नेमका परिणाम काय होणार? ते दहा दिवसांनीच लक्षा येईल
दरम्यान मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत.