जळगाव प्रतिनिधी । भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी जळगावातील एका हॉटेलवर धिंगाणा घालून रिव्हॉल्व्हरने धमकावल्याची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शेवटी समझोता झाला असला तरी एमआयडीसी पोलिसात अनिल चौधरी व जळगाव महापालिकेतील भाजपचे नगरसेवक भगत बालाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौधरी यांचा धिंगाणा सीसीटिव्हीत कैद होऊन हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जळगाव-भुसावळ महामार्गावर हॉटेल महिंद्रा नावाने ढाबा आहे, येथे रविवार (ता.१३) रेाजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सुनील माळी यांचा भाऊ मुकेश दत्तात्रय माळी त्यांच्या सेाबत ४-५ लोकांना घेवून जेवणासाठी आला होता. थोड्याच वेळात या ठिकाणी अनील छबिलदास चौधरी, नगरसेवक भगत बालाणी असे तीन चार लोक जेवणासाठी आले. जेवण अटोपल्यावर अनील चौधरी याने एका खुर्चीला लाथ मारुन नंतर तीच खुर्ची उचलून एका कुत्र्याला मारुन फेकली. यावरुन वाद विकोपाला जावुन मुकेश माळी व अनील चौधरी यांच्यात शाब्दीक चकमक उडून शिवीगाळ झाली. वाद वाढल्याने दोन्ही गटातील लोक एकमेकांवर धावुन गेले. त्यापैकी अनील चौधरी सोबतच्या तरुणाने रिव्हॉल्वर काढून समोरच्यांवर रेाखले होते.
घडल्या प्रकाराची राजकिय गोटात चर्चेला उधाण येवून, माहिती पेालिसांपर्यंत पोहचली. निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घडला प्रकार वरीष्ठानाक कळवून चौकशीसाठी उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, जितेंद्र राजपुत, किशोर पाटिल अशांना चोकशीला पाठवले ढाबा मालकाची चौकशी करुन सीसीटिव्हीचा डिव्हीआर ताब्यात घेत तपासणी केल्यावर संपुर्ण घटनाक्रम चित्रीत झाल्याचे आढळून आल्याने या प्रकरणी पेालिस कर्मचारी मुकेश पाटील याच्या तक्रारीवरुन अनील छबीलदास चौधरी, केदारनाथ वामन सानप, दुर्गेश ठाकूर, अनील चौधरीचा वाहन चालक गोलू (सर्व रा.भुसावळ), भगत रावलमल बालाणी, याच्यासह दुसऱ्या गटातील मुकेश दत्तात्रय माळी, छोटू पाटिल आणि त्यांच्या सोबत आणखी इतर अशा मध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील करीत आहेत.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1478673935671283