जळगाव, प्रतिनिधी । नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त जळगाव येथे रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून वंदना करण्यात आली.
जळगाव येथील दाणा बाजार चौकातील सुभाष चौकामधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चित्रा मालपाणी यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली व फाऊंडेशनच्या महिला सदस्यांसोबत जयंती साजरी केली. कार्यक्रमाला सौ.पद्मावती राणा, दीपा तापडिया, हर्षाली सोनवणे, आदी उपस्थित होत्या.