जळगाव प्रतिनिधी । अधिक मास महिन्याच्या निमित्ताने शहरातील रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या वतीने पांझरापोळ येथे गोपूजन करण्यात आले. यावेळी रिध्दी जान्हवी फाऊंडेशन महिला सदस्या यांची उपस्थिती होती.
अधिक मास महिना गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. मास महिन्यात देवाची आराधना केल्यास अधिक पुण्य लाभते. या निमित्ताने शहरातील रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे नेरी नाका येथील पांझरापोळ गोशाळेत श्रीकृष्ण मंदिरात आरती करून फाऊंडेशनच्या महिला सदस्यांनी गोपूजन केले. नैवद्य स्वरूपात केळी गाईंना खावू घालण्यात आले. यावेळी रिध्दी जान्हवी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा मालपाणी, दिपा तापडीया, पल्लवी इंदानी, मनीषा पाटील, किरण शर्मा, कीर्ती राणा, पद्मावती राणा, हर्षाली पाटील आदी महिला उपस्थित होत्या.