Home Cities एरंडोल रिंगणगाव येथे विजेच्या धक्काने महिलेचा मृत्यू

रिंगणगाव येथे विजेच्या धक्काने महिलेचा मृत्यू


एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे नळाचे पाणी भरतांना विजेचा धक्क्याने २७ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी एरंडोल येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नळानां पाणी आले असता पाणी भरून झाल्यावर विजेची मोटर काढत असताना ज्योती किशोर जगताप (वय २७) रा. रिंगणगाव ता.एरंडोल जि. जळगाव या महिलेला विजेचा शॉक लागल्याने ती खाली पडल्या. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर तिला तपासण्यात आले व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी सुनील नारायण शिंदे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, निसार पटेल अमित तडवी हे पुढील तपास करीत आहेत. ज्योती यांच्या पश्चात पती दोन मुले व सासू असा परिवार आहे.


Protected Content

Play sound