नवी दिल्ली : वृत्तसंस्था । । सोनिया गांधी यांनी नाराज नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत समेट झाला असल्याने आता राहूल गांधी यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, सोनिया गांधी यांनी आज नाराज नेत्यांसोबत बैठक घेतली. यात उपस्थित नेत्यापैकी एकाही नेत्यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीवर विरोध केला नाही. यामुळे नाराज नेत्यांची मनधरणी करण्यास यश आले असून राहुल गांधींना लवकरच पक्षाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
आज सोनिया गांधी यांनी सुमारे चार तासांपेक्षा जास्त बैठक घेऊन नेत्यांची मते जाणून घेतली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, नेत्यांची नाराजी दूर झाल्याने दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.