नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सकडून समन्स मिळाल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसंदर्भातील तक्रारीवर फेसबुकने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
या व्हिडिओमधून बलात्कार पीडित मुलीच्या पालकांची ओळख उघड झाल्याचे सांगण्यात आलं होते.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या नोटिसीनुसार, राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अपलोड केलेली पोस्ट बेकायदेशीर आहे. ही पोस्ट त्वरित काढून टाकण्याची विनंती केली आहे. यापूर्वी एनसीपीसीआरने राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यासाठी ट्विटरला पत्र लिहिले होते.
एनसीपीसीआरने यापूर्वी फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. तीन दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, त्यांनी फेसबुकला समन्स जारी केले. नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधी यांना मेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले.जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना पाठवलेल्या मेलची प्रत एनसीपीसीआरला पाठवली, तेव्हा बाल हक्क समितीने त्यांना समन्समधून सूट दिली
दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाचा फोटो राहुल गांधी यांनी पोस्ट केला होता. यावर कारवाई करत ट्विटरने हे ट्विट काढून टाकले.