धरणगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय हिन्दू दलित समितीच्या राष्ट्रीय सह प्रवक्तापदी चेतन कन्हैया वाघरे (महाराज) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रामदेवबाबा नगर येथील रहिवाशी चेतन वाघरे यांची राष्ट्रीय हिन्दू दलित समिती, अखंड भारत (भारत विराज मिशन) च्या बाबतचे कर्तव्य लक्षात घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक राज यांनी संघटनेच्या राष्ट्रीय सह प्रवक्तापदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.