पाचोरा प्रतिनिधी । येथील एम.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कापसे, पंचायत समिती गणेश चौधरी, नगरपालिका उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील दिनेश मोरे, भुषण पाटील, रामदास खरे, समीर अहमद शेख, विकास पाटील, विनोद धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानीत करण्यात आले. याशिवाय, निबंध स्पर्धा:- करिश्मा देवेंद्र भंगाळे ११ वि सायन्स चिनावल, चित्रकला स्पर्धा:-सौरभ प्रदीप बढे,मुक्ताईनगर; रांगोळी स्पर्धा:- सायली किरण काळे,भुसावळ; प्रश्नमंजुषा स्पर्धा:- कविता गजानन गावंदे जामनेर ह्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मतदार दिनाचे महत्व विशद केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती नगरपालिका आदींमधील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.