राष्ट्रीय दलित पॅन्थरचे विविध मागण्यांंसाठी आमरण उपोषण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  ।  शहराच्या विविध समस्या सोडवण्यात याव्यात  या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पॅन्थरतर्फे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. या समस्या लवकरात लवकर न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महानगराध्यक्ष शांताराम अहिरे यांनी दिला आहे. 

 

राष्ट्रीय दलित पॅन्थरचे जळगाव महानगराध्यक्ष शांताराम अहिरे यांनी  विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण पुकारले आहे.  हे उपोषण शिवाजीनगर पुलाचे काम संथ गतीने सुरे आहे. यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. याच प्रमाणे येथील रस्ता खराब झाला आहे.  पुलाचे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने  दावखान्याच्या व इतर तातडीच्या  कामासाठी शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना फेऱ्याने जावे लागत आहे. तरी शिवाजीनगर पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशनवरील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे. शिवाजीनगर भागातील दुर्गादेवी मंदीराच्या शेजारील झोपडीचे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी आमरण उपोषण करीत असल्याची माहिती शांताराम अहिरे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली आहे.  आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री. अहिरे यांनी यावेळी दिला आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/345317690280558

 

Protected Content