राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष युवापदी लोकेश सपकाळे

 

भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष युवा या पदावर यावल तालुक्यातील अंजाळे येथील सामाजिक कार्यकर्ते लोकेश दिलीप सपकाळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकेश दिलीप सपकाळे यांची राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष युवा पदावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे यांनी नियुक्त केली आहे. राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेची ध्येय धोरणे व उद्दिष्ट तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावित त्यांचा लढा दलित आदिवासी भटके-विमुक्त शेतकरी कामगार अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी आहे. त्यांच्या प्रश्नावर जनमत संघटित करून तीव्र लढा उभारावा राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेच्या उद्दिष्टांना कुठेही बाधा येऊ नये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी विचारात विचार बळकट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे असे नियुक्ती पात्रात म्हटले आहे. लोकेश सपकाळे यांची नियुक्ती तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content