राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने माणुसकी समुहातर्फे रक्तदान शिबिर

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील कळमसरा येथे सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप, कळमसरा यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन गाडगे बाबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

पाचोरा तालुक्यातील कळमसरा सरपंच अशोक चौधरी, सुट्टी वर आलेले जवान प्रसाद पवार, चंद्रकांत गीते, नितीन क्षीरसागर यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर कवी मंगलदास मोरे यांनी स्वलिखित आरती गायन केली व रक्तदान शिबिराला सुरुवात केली. संत गाडगेबाबा यांचे विचार घेऊन काम करणारे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी गाडगेबाबांनी केलेले रुग्णसेवेचे कार्य, निराधारांना आधार देणे, अंधश्रद्धा रूढी परंपरा, यावर माहिती विशद करून कार्याची थोडक्यात माहिती दिली. रक्तदान शिबिरासाठी सुट्टीवर आलेल्या जवानांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले व रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. रक्तदान शिबिराचे हे चौथे वर्ष होते. यावेळी गंगा नर्सरीचे संचालक वृक्षमित्र दत्तात्रय तावडे, किरण धोबी, ज्ञानेश्वर चौधरी, जवान प्रसाद पवार, चंद्रकांत गीते, नितीन क्षिरसागर, गजानन तेली, दत्तात्रय तेली, राजेंद्र पाटील यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप व कळमसरा येथील ग्रामस्थ तर रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक, जळगाव यांनी सहकार्य केले.

Protected Content