जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या दगडफेकीचा निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज महात्मा गांधी उद्यानातील पुतळ्याला माल्यार्पण करून हल्लेखोरांना सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी काही समाजकंटकांनी व माथेफिरूने दगडफेक केली होती. न्यायालयाचा निर्णय आल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला असताना शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? आजपर्यंत नेत्यांच्या घरावर अशा प्रकारे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीच घडलेले नाही. महाराष्ट्राचे लोकनेते असलेले शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारचा दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी प्रदेश चिटणीस एजाज मलिक, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, ललित बागुल, युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष रिकु चौधरी, सुशील शिंदे, अॅड. सचिन पाटील, अमोल कोल्हे, राजू मोरे, किरण राजपूत संजय जाधव रहीम तडवी, रिजवान खाटीक, राहुल टोके, प्रसाद वानखेडे, अकील पटेल, जावेद भाई मोहसीन भाई आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/306115248315341