राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस पंकज बोरोले यांच्यासह तरसोद ग्रामस्थांचे उपोषण

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील तरसोद येथील विविध सेवा सहकारी सोसायटी येथे निवडणुकीसंदर्भात झालेल्या फसवणुकीबद्दल नशिराबाद पोलिसात अर्ज दिला आहे. मात्र यावर कुठलीही कारवाई न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस पंकज बोरोले यांच्यासह ग्रामस्थ गुरुवार 12 मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

 

तरसोद येथील विविध सेवा सहकारी सोसायटीमध्ये झालेल्या फसवणुकीबाबत कारवाई करावी या मागणीचा दि. २९ मार्च रोजी नशिराबाद पोलिसात अर्ज करण्यात आला आहे. मात्र यावर आजपावेतो कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल देखील झालेला नाही. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पंकज बोरोले, किशोर भाऊराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

Protected Content