Home आरोग्य राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा रूग्णालयात ‘फेस शिल्ड’चे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा रूग्णालयात ‘फेस शिल्ड’चे वाटप


जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेर आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून जिल्हा कोवीड रूग्णालयात कोरानाशी दोन हात करणारे कर्मचारी, नर्स आणि डॉक्टर यांना ‘फेस शिल्ड’चे मोफत वितरण करण्यात आले.

यावेळी जळगाव सिव्हिल सर्जन डॉ. किरण पाटील, रा. कॉ. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ.दीपक पाटील, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अशोक पाटील, डॉक्टर सेलचे नेते डॉ.आर.एस. पाटील व प्रभारी डीन डॉ. टोके तसेच मेट्रन कवीश्वर व इतर लोक उपस्तीत होते.


Protected Content

Play sound