राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सहस्त्रचंद्र दर्शन सप्ताहाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव महानगरच्या वतीने दि. १२ ते १९ डिसेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सहस्रचंद्र दर्शन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.१० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात पक्षध्वजाचे ध्वजारोहण करून केक कापण्यात येईल. सकाळी ११ ते १ यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात स्क्रिनवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व पक्षाचे जेष्ठ नेते कार्यकर्त्यांना संबोधित करून पक्ष संघटनेविषयी मार्गदर्शन करतील. दुपारी १ वाजता १०० गरजू व विधवा महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साड्यांचे वाटप करण्यात येईल. दुपारी २.३० वाजता फुटपाथ वरील व गाडगेबाबा निराधार निवारा केंद्र येथील वृद्धांना व गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात येईल. तसेच सदस्यता नोंदणी अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर , शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आदी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी जळगाव शहरमहानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

Protected Content