राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची लागण !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विधान परिषद सदस्य बाबा जानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियातून आज (शनिवार) यासंदर्भातील माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी ताप आणि सर्दी झाली होती. यानंतर कोरोनाची टेस्ट घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासूनच आपल्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारीच त्यांची अँटिजेन चाचणी घेतली होती. त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. दरम्यान, प्रशासनाकडून बाबाजानी दुर्राणी यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Protected Content