जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देशातील वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहराच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देशात पेट्रोल , डिझेल, गॅॅस सिलेंडरचे दर तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये रोजच वाढत आहेत. या वाढत्या महागाई विरोधात आकाशवाणी चौकात राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात “जनता भरते जीएसटी आमदार जातात गुवाहाटी”,”५० खोके महागाई ओके”,”महागाई कशासाठी आमदार खरेदी साठी” अश्या घोषणा महागाई विरोधात देण्यात आल्या. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी यांचा नेतृत्वात करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजू मोरे, माजी नगरसेवक सुनील माळी, इब्राहिम तडवी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, सुशील शिंदे, रहीम तडवी, रफिक पटेल, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, साजिद पठाण, चेतन पवार, नरेंद्र शिंदे, योगेश साळी, सचिन साळुंखे, जयेश साळुंखे, ऋषिकेश देशमुख, हितेश जावळे, अशोक सोनवणे, जयेश नेवे, खलील शेख, किरण चव्हाण, हारून ,रितेश महाजन आदी उपस्थित होते.