Home क्राईम रावेर शौचालय प्रकरण : दोघे आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

रावेर शौचालय प्रकरण : दोघे आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समिती शौचालयाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपी लेखाधिकारी लक्ष्मण पाटील आणि समाधन निंभोरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. त्यामुळे आता दोघांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

महाराष्ट्राभर गाजलेला रावेर पंचायत समितीचा बहुचर्चित शौचालय भ्रष्ट्राचार प्रकरणावर एक महत्वाची अपडेत रावेर पोलिसांकडून मिळालेली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान निंभोरे तसेच रावेर पंचायत समितीचे लेखाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी भुसावळ कोर्टात जामीनसाठी अर्ज केला होता. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. शौचालय प्रकरणातुन रावेर पोलिसांनी ६८ लाख रुपये या प्रकरणात वसुल करण्यात आले आहे. लवकरच बाकी आरोपींची अटकसत्र राबविले जाईल असे तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी सांगितले.


Protected Content

Play sound