रावेर प्रतिनिधी । रेशन दुकानांद्वारे गरीब कुटुबांना वितरीत केली जाणारी साखर व चनादाळ गोडाऊनमध्ये उपलब्ध झाली आहे तर तुरदाळ देखिल लवकरच उपलब्ध होणार आहे, असल्याचे पुरवठा प्रशासना कडून सांगण्यात आले आहे. यावेळी मकर संक्रातच्या गोडसणाला गरीब कुटूबांना खुल्या बाजारातून साखर, चनाडाळ, तूरदाळ विकत घेऊन गरीब कुटुंबानी सण साजरा केला.
जानेवारीमध्ये फक्त अंत्योदय ते अन्न सुरक्षा सर्वांना गहु व तांदूळच दिले होते. साखर दिली नव्हती, आता गोडाऊन मध्ये चनाडाळ 217 क्विंटल प्राप्त झाली असून जानेवारी, फेब्रुवारी, मार्चची 266 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. लवकरच 278 क्विंटल तुरदाळ प्राप्त होणार आहे कर्तव्यदक्ष तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी आता गरीब जनतेच्या चुलीपर्यंत हे सर्व पोहचेल तो पर्यंत लक्ष ठेवण्याची मागणी सर्वसाधारण जनतेतुन होत आहे.