रावेर शहरात हद्दवाढ झालेल्या वसाहतीसाठी सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात

रावेर प्रतिनिधी । रावेर पालिकेची हद्दवाढ झालेल्या वसाहतीच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून कोरोना प्रभाव कमी होताच नवीन वसाहतीच्या चार नगरसेवकांसाठी निवडणूक घेण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी सांगितले.

रावेर नगरपालिकेची हद्दवाढ होऊन एक वर्षाच्या वर कालावधी झाला, परंतु अद्यापी प्रशासनाकडून निवडून घेण्यात आली नाही. सद्या नवीन वसाहतीमध्ये पालिकेकडून वसाहतीच्या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून कोरोनाचा प्रभाव कमी होताच या भागात पालिका निकडणूक घेण्यासाठी सकारात्मक असल्याचे पालिकेचे सिईओ रविंद्र लांडे यांनी सांगितले. दरम्यान पुढील वर्षी पालिका सार्वत्रीक निकडणुका असून त्यांच्या सोबतच नवीन वसाहतीच्या पण निवडूनका घेण्याचे समाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना सांगितले. पुढे राजपूत म्हणाले पालिकेकडून या वाढीव वसाहतीत मूलभूत सुविधा सुध्दा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Protected Content