रावेर, प्रतिनिधी । शहरात दंगलीची संचारबंदी सुरु असतांना कोरोनाची संचारबंदी अजुन लागू नाही म्हणून तालुकाभरातील अत्यावश्यक वस्तु विक्री करणाऱ्यां व्यापा-यांनी तुर्तास शहरासाठी कोणत्याही पासेस मागु नये असे आवाहन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.
रावेर शहरात सद्या दंगलीची संचारबंदी सुरु असतांना अनेक व्यापारी अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकानदार यांनी कोणतीही पासे तुर्त मागु नये. प्रांतधिका-यां कडून शिथिलच्या केलेल्या वेळेस आपण अत्यावश्यक सेवा जनतेला पुरवावी. दंगलची संचारबंदी संपल्यानंतर कोरोनाची संचारबंदी शहरात लागू होईल. त्यावेळेस दुकानदार,वाहतूकदार, व इतर अत्यावश्यक सेवा पुरवणा-या व्यापारी दुकानदार यांना पासेस दिल्या जाणार असल्याचे तहसिल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .
पासेससाठी होतेय तहसिल कार्यालयात गर्दी
रावेर दंगलीची शिथिलता मिळताच तहसिल कार्यालयात पासेससाठी व्यापारी, वाहतूकदार यांची प्रचंड गर्दी होतेय. प्रत्येक जण अत्यावश्यक सेवेसाठी पासेसची मांगणी करतोय. त्यामुळे रावेर दंगल संचारबंदी संपल्यावर कोरोना संचारबंदी लागू झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्या निर्दशनानुसार पासेस पुरवण्यात येणार आहे.