रावेर प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये रावेर शहरासह तालुक्यातील रसलपूर येथे प्रत्येकी पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले असून प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याचे दिसून येत आहे. प्रशासन खूप प्रयत्न करत असले तरी रूग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. यातच आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये रावेर शहरातील पाच तर तालुक्यातील रसलपूर या गावातील पाच असे एकूण दहा रूग्ण कोरोनाने बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तहसील प्रशासनाने या माहितीला दुजोरा दिला आहे. या रूग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाईन करण्यात येणार असून त्यांच्यातील ज्यांना लक्षणे आढळतील त्यांचे स्वॅब तपासण्यात येणार आहेत. तर या रूग्णांचा रहिवास असणार्या भागाला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे.