रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील रसलपूर येथील हार्डवेअरचे दुकान मालकाला सिमेंटच्या पिशव्या कमी भावान न दिल्याच्या कारणावरून तीन जणांनी बेदम मारहाण करून दुकानातील सामानांची नासधुस केली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, विजय लक्ष्मण महाजन (वय-४०) रा. रसलपूर ता. रावेर यांचे रावेर ते रसलपूर रस्त्यावर हार्डवेअर आणि बिल्डींग मटेरियलचे दुकान आहे. १९ ऑक्टोबर रोजी विजय महाजन यांच्या दुकानावर दुपारी ३ वाजता शेख जावेद सलीम, शेख अस्लम शेख कादर रा. रसलपूर आणि अस्लम शेख साबीर रा. नशिराबाद ता.जि. जळगाव हे आले. त्यांनी सिमेंटची पिशवीचा भाव कमी करून मागितला. याला दुकानदार विजय महाजन यांनी सिमेंटच्या पिशव्या कमी भावात देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी दुकानदार महाजन यांची कॉलर पकडून बेदम मारहाण केली. तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. महाजन यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष सानप करीत आहे.