रावेर, प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्तीत व अपघातात निधन झालेल्या कर्त्या व्यक्तीच्या १४ वारसांना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नुकतेच धनादेशांचे वाटप करण्यात आले.
महाराजस्व अभियानच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती व विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, तहसिलदार सौ. उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते हे विशेष अर्थसहाय्याचे १४ धनादेश तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एका धनादेशाचे यावेळी वाटप करण्यात आले. यावेळी रावेर ग्रामीण रुग्णालयात शवच्छदन करणारे सतीष सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिजाबराव चौधरी, गोंडू महाजन, डॉ राजेंद्र पाटील, संजय जमादार, रमेश पाटील, महेश लोखंडे, प्रकाश सुरदास, ई.जे. पाटील, रामदास लहासे, निवासी नायब तहसिलदार संजय तायडे, संजय गांधी निराधार योजनेचेचे नायब तहसिलदार मनोज खारे, जे एन शेलकर, रमजान तडवी, सचिन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
१७ फेब्रुवारीला आमदारांचा जनता दरबार
आगामी दि. १७ फेब्रुवारीला आ. चौधरी यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला असून या दरबारात तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील जनतेने या जनता दरबारात काही तक्रारी असल्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.