रावेर प्रतिनिधी । महाआवास योजनेची घरकुल संदर्भात महत्वाची आढावा बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंचायत समितीत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या प्रमुख उपस्थित आढवा बैठक संपन्न झाली.
रावेर तालुक्यात अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी महत्वाची बैठक संपन्न झाली. तालुक्यात सद्या प्रधानमंत्री आवास योजना ३६५ घरकुले अपूर्ण असून २ हजार १४६ घरकुले पूर्ण आहे. रमाई आवासचे १८७ घरकुले अपूर्ण असून ८६४ घरकुले पूर्ण आहे.शबरी आवास योजनेचे १४७ घरकुले अपूर्ण असून २४२ घरकुले पूर्ण आहे.बैठकीला धीरज धनगर विनय पाटील प्रतिक पाटील शशिकांत सपकाळे राहुल गाढे वसिम तडवी आकाश चौधरी आदी उपस्थित होते.
या विषयावर झाली चर्चा
यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजूरी देणे, मंजूर घरकुलांना पहिल्या हप्ताचे १०० टक्के वितरण करणे,घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के घरकुले भौतिकदृष्टया पुर्ण करणे, प्रलंबित घरकुले पुर्ण करणे, सर्व घरकुले आर्थिकदृष्टया पुर्ण करणे, गवंडी प्रशिक्षण पुर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे, कायम स्वरुपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडींग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग / जॉब कार्ड मॅपींग १०० टक्के पुर्ण करणे,शासकीय योजनांशी कृतिसंगम व नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.