रावेर, प्रतिनिधी ।बहुप्रतीक्षित रावेर कापूस खरेदी केंद्रास आज खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी कापुस खरेदी केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या आहेत. कापसाने भरलेल्या ट्रक्टरांमुळे महामार्ग जाम झाला आहे.
कापूस खरेदी केंद्राच्या उदघाटनप्रसंगी खा. रक्षा खडसे, माजी आमदार अरुणदादा पाटील, जि. प. सदस्य नंदकिशोर महाजन, जिल्हा बँक जनरल मॅनेजर एम. टी. चौधरी, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, उपसभापती उस्मान तडवी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, डॉ. राजेंद्र पाटील, माजी प. स. उप सभापती सुनिल पाटील, प. स. सदस्य दिपक पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, डी. सी. पाटील, रमेश पाटील, राजिव पाटील, पितांबर पाटील, सुरेश चिंधु पाटील, भागवत पाटील, प्रा. सी. एस. पाटील, बाजार समिती सचिव गोपाळ महाजन, उप सचिव संतोष तायडे, ग्रेडर पकंज झोले आदी उपस्थित होते.
ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेपूर्वी एक दिवस आधी कळविण्यात येईल तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आसे आवाहन बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन यांनी केले आहे.
रावेर तालुक्यातील बाजार समिती व शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नसतांना मागील वर्षी केंद्र सरकारच्या धोरणानुसार ग्रेडर उपलब्ध न केल्याने ७० टक्के कापूस हा बाहेर विकावा लागला. यावर्षी १० हजारगाठींचे खरेदी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. तालुक्यातील ४००-४५० शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. हा कापूस पूर्णपणे खरेदी करावा यावर्षी कापूस खरीदी उशिराने होत असल्याने १० हजार गाठी खरेदी होतील किंवा नाही याबाबत शंका असून हा निकष काढण्यात यावा अशी मागणी बाजार समिती संचालक डॉ. राजेंद्र पाटील यांनी केली आहे.
तालुक्यातील उर्वरित कापसाची खरेदी पूर्ण झाल्याशिवाय हे केंद्र बंद करू नेय. शेतकऱ्यांचे पेमेंट लवकरात लवकरच देण्याची व्यवस्था करावी. कापूस खरेदीस बाजार समिती व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी केले आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/416791992802733