रावेर, प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी तालुक्यातील शिंगाडी, सिंगत ग्रामपंचायतील अचानक घेत देऊन ग्रामपंचायत स्तरावरील योजनांचा आढावा घेत रेकॉर्ड तपासले.
याबाबत वृत्त असे की, रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी आज अचानक शिंगाडी व सिंगत ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. यामुळे ग्रामपंचायतस्तरावर चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी गट विकास अधिकारी कोतवाल यांनी सिंगत येथील सार्वजनिक शौचालयाबाबत आलेल्या तक्रारीची चौकशी केली. तसेच दोन्ही गावांचे ग्रामपंचायत स्तरावरील विविध योजनांची माहिती घेतली. ‘ड’ च्या यादित नावे असलेल्या कुटुंबाचे आधार अपडेशनबाबत ग्रामसेवकांकडून आढावा घेतला. तसेच गावातील नागरीकां घराबाहेर निघतांना मास्क वापरण्याचे अवाहन कोतवाल यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी डी. एस. तडवी, शाखा अभियंता डी. आर. महाजन देखील होते.