रावेर प्रतिनिधी । रावेर कृषी उपन्न बाजार समितीला पुढील सहा महीने मुदतवाढ मिळावी म्हणून मुंबईत आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती निळकंठ चौधरी यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन विद्यमान संचालक यांना सहा महीने मुदतवाढ देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर कृषी उपन्न बाजार समितीची मुदत संपत असून कोरोनाचा पादुर्भावामुळे जिल्ह्यात इतर बाजार समित्यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्याच पध्दतीने रावेर बाजार समितीला देखील मुदतवाढ मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती माजी सभापती निळकंठ चौधरी यांनी आज आमदार शिरीष चौधरी यांना घेऊन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदन व मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती पितांबर पाटील व इतर सहकारी देखील उपस्थित होते.