रावेर प्रतिनिधी । जागतील महिला दिना निमित्त रावेर पोलिस स्थानकात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पंचायत समिती सभापती कविता कोळी, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल आदीची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलीस स्टेशनचा कार्यभार प्रातिनिधिक स्वरूपात महिलांचे हातात पोलीस स्टेशन चा कार्यभार सोपविला असून पोलीस निरीक्षक म्हणून आदिवासी समाजाची गृहिणी सौ चांदणी जब्बरर्सिंग बारेला रा गारखेडा यांना सोपविला असून त्यांचे मदतीसठाणे अंमलदार-सौ वर्षा प्रवीण पाटील, महिला पोलीस दीपाली नितीन लहासे केरहाळे बु, गार्ड अंमलदार-मनीषा विजय गायकवाड भोर ,कारकून जयश्री अशोक शिंदे, रावेर, गोपनीय सुवर्णा जयंत भागवत रावेर, दुय्यम अधिकारी कांता बोरा, गाजला बी शे कामकुद्दीन रावेर, शारदा देविदास चौधरी, रिझर्व्ह PSO संगीता सुभाष अकोले, क्राईम-सुनीता दिनकर वानखेडे बोहरडा यांचेकडे कार्यभार देऊन पोलीस स्टेशन आवारात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
या महिलांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे,पंचायत समिती सभापती सविता कोळी, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल, डॉ योगिता संदीप पाटील, डॉ संध्या मिलिंद वानखेडे, डॉ सुचिता कुयते, डॉ प्रीती साबळे, डॉ सुनीता पाटील, डॉ हर्षा पाटील, डॉ अमीता महाजन, डॉ चैताली पाटील, डॉ यास्मिन खान, नगरसेविका नुसरत परवीन, शबाना बानो, रशिदा बी जाकीर मो, शाईन परवीन शिक्षिका, मुख्याध्यापिका वाशीम बानो, रिजवना बोहरी, तस्लिमा पठाण, सेविका संगीता गजरे, ग्रामीण रुग्णालय पाल, मुख्याध्यापिका सुनीता वाणी, होमगार्ड, महिला पोलीस माधवी मोरे, महिला पोलीस रईसा तडवी अश्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.