रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या वाढीव वसाहतीसाठी निवडणूक घेण्यात येणार असून चार जागांसाठी प्रशासना कडून आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. वाढीव वसाहतीचे १२ हजार ९०० मतदार एक वर्षासाठी ४ नगरसेवक निवडून पालिकेत पाठविणार आहे. अंतीम अधिसूचना २४ डीसेंबरला प्रसिध्द होणार असून जानेवारी २०२१ ला निवडणुक होण्याची शक्यता आहे.
पालिका हद्दवाढ होऊन सुमारे वर्षभरानंतर ४ जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाकडून वाढीव भागासाठी नगरसेवक सदस्य संख्या निश्चित केली असून नासिक विभागीय आयुक्ता राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच वाढीव ४ जागांसाठी आरक्षण निश्चित प्रसिध्द केले आहे.याचे आदेश रावेर पालिकेला प्राप्त झाले आहे.
४ नगरसेवकांसाठी असे आहे आरक्षण
रावेर नगर पालिकेच्या वाढीव भागातील १२ हजार ९०० मतदार चार नगर सेवक निवडून देणार आहे. यामध्ये एक जागा एससी साठी राखीव दूसरी जागा एसटी (महिला) साठी राखीव, तिसरी जागा ओबीसीसाठी राखीव चौथी जागा (महिला) साठी राखीव असणार आहे. दोन प्रभागात ही निवणुक होणार आहे. अंतीम अधिसूचना २४ डीसेंबरला प्रसिध्द होणार असून जानेवारी २०२१ ला निवडणुक होण्याची शक्यता आहे.