रावेर पंचायत समिती सदस्य महिलेच्या पतीदेवाचा हस्तक्षेप ;कर्मचारी हैराण

 

 

रावेर, प्रतिनिधी । काही दिवसांपासुन रावेर पंचायत समितीमध्ये एका महिला पदाधिका-याच्या पतीदेवाच्या हस्तक्षेप वाढल्याने कर्मचारी चांगलेच त्रस्त झाले आहे.

 

दिवसभर पंचायत समितीत बसणाऱ्या त्या पतीराजामुळे कर्मचारी हैरान आहे.

 

महिला पदाधिकारी असलेल्या बहुतांश ठिकाणी त्यांचे पतीच कारभार चालवित असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात सत्यता किती आणि ‌टीकेचा सूर किती, याकडे दुर्लक्ष केले तरी अनेक ठिकाणी अशीच स्थिती असल्याचे दिसून येते. अनेक महत्वाच्या ठिकाणी महिला कारभार बघत आहे. परंतु, रावेर पंचायत समितीमध्ये या पतीदेवाचा हस्तेक्षप वाढल्याने येथील कर्मचारीवर्ग हैरान आहे.

 

 

वरकमाईसाठी वसूलीचे टार्गेट

 

 

एका कर्मचा-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रावेर पंचायत समितीमध्ये पतीदेव यांच्याकडून काही विभागांना    वरकमाईसाठी ठराविक रक्कम वसूलीचे टार्गेट दिल्याची जोरदार चर्चा आहे. सगळेच कर्मचारी नाखुश आहेत . भ्रष्ट्राचार रोखण्याची जबाबदारी असलेलेच भ्रष्ट्राचार करायला भाग पाडत असल्याचीदेखिल ओरड़ कर्मचा-यांमध्ये आहे.

 

 

भाजपाच्या  ना.. खाऊंगा.. ना खाने दुंगा.. या नार्याला काही कर्मचा-यांना टार्गेट देऊन या पतींदेवाने हरताळ फासले आहे. याकडे रावेर तालुक्यातील इतर भाजपा पदाधिकारी व विद्यमान पंचायत समिती सदस्यांनी लक्ष घ्यालण्याची मागणी होत आहे.

 

Protected Content