Home आरोग्य रावेर तालुक्यात मागील बारा तासात तेरा पॉझिटिव्ह ; राष्ट्रवादी उपमुख्यमंत्र्याकडे करणार तक्रार

रावेर तालुक्यात मागील बारा तासात तेरा पॉझिटिव्ह ; राष्ट्रवादी उपमुख्यमंत्र्याकडे करणार तक्रार

0
34

रावेर, प्रतिनिधी । रावेर तालुक्यात मागील मागील बारा तासात तब्बल १३ जण कोरोना पोझिटीव्ह आले असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. एकूण संख्या २२९ पर्यंत झाली आहे .तालुक्यात कोरोनाची साखळी तुटता-तूटेना झाली आहे.

रावेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसें-दिवस वाढत असून अनेकांच्या काळजीत भर पडली आहे. मागील बारा तासात रावेर तालुक्यातील सावदा एक, रसलपुर एक, चिनावल दोन, विवरे आठ आणि एक बक्षीपुर असे एकूण तेरा कोरोना पोझिटीव्ह आले आहे. तालुक्यात कोरोना साखळी रोखण्यात अपयश आल्याने आज राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहेत.


Protected Content

Play sound