रावेर प्रतिनिधी । रात्री उशीरा तालुक्यात पुन्हा सात नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले असून याला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.
आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात सहा कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यात चिनावल व ऐनपूर येथील प्रत्येकी तीन तर रमजीपूर येथील एका रूग्णाचा समावेश आहे. तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून या रूग्णांच्या रहिवासाचा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याचे यातून दिसून आले आहे.