Home आरोग्य रावेर तालुक्यात पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

रावेर तालुक्यात पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले


रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोवीड केअर सेटरकडून प्राप्त झालेल्या अहवालात एकुण ४ कोरोना बाधित रूग्ण आढळले. रावेर तालुक्यात ४९ कोरोना बाधित रूग्ण झाली असून पन्नासच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे.

आज आढळून आलेल्या ४ कोरोना बाधितांमध्ये चिनावल २, रावेर १ आणि वाघोदा खुर्द १ यांचा समावे आहे. तालुक्यातील एकुण ४९ झाली असून ११ जणांचा मृत्यू झालाय. आढळून आलेल्या रूग्णांच्या वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात काम सुरू आहे. या वृत्ताला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान शहरातील वीस कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, वृध्दांसह महिला, बालक यांची काळजी घ्यावी, मास्क लावावे, लॉकडाऊनचे नियम पाळावे, आपला परिसर सॅनिटायझर करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound