रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील घरकुल लाभार्थाना घरकुल कसे बांधायाचे याचा डेमो बघता याव म्हणून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डेमो-हाऊस बांधकाम करण्यात येणार आहे. याची लाईन-आऊट आज टाकण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल जि. प. उप विभागीय बांधकाम अधिकारी चंद्रशेखर चोपडेकर उपस्थित होते.
प्रत्येक गरीब कुटुंबाला घरकुल मिळावे म्हणून शासन वेग-वेगळ्या योजनांद्वारे त्यांना घरकुलांचा लाभ मिळवुन देते. परंतु, घरकुलचे बांधाकाम कसे करायच याचा प्रश्न घरकुल लाभार्थी यांच्या समोर असतो. आता याची देखील व्यवस्था पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. लवकरच पंचायत समितीच्या आवारात ग्रामीण भागातील जनतेला घरकुल कसे असावे हे समजावे यासाठी डेमो-हाऊस तयार करण्यात येत आहे. यासाठी आज लाईन-आऊट टाकण्यात आली आहे.
असे असेल डेमो-हाऊस
रावेर पंचायत समितीच्या आवारात तयार होणा-या डेमो-हाऊस १ लाख ९० हजार रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे.२७० चौरस मीटर जागेत तयार डेमो-हाऊस मध्ये ९ बाय १० चा हॉल ७ बाय ९ चे किचन एक टॉयलेट-बाथरुन स्टाईल दरवारे-खिडकी लावुन तालुक्यातील घरकुल लाभार्थीना बघण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.
डेमो-हाऊस लाभार्थानी बघावे – कोतवाल
येथे तयार करण्यात येणारे डेमो हाऊस पूर्ण झाल्या नंतर याच्या आवारात पारस बाग लावण्यात येतील तसेच पावसाचे पाणी संकलीत करण्यात येणार आहे.शौसखड्डा देखील तयार करण्यात येणार आहे.तालुक्यातील घरकुल लाभार्थीनी येथे तयार होणारे डेमो-हाऊस नक्की बघण्याचे अवाहन गट-विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.