रावेर प्रतिनिधी । रात्री उशीरापर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात आठ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
रावेर तालुक्यात अन्य ठिकाणांच्या तुलनेत थोडा विलंबाने कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी अलीकडच्या काळात दररोज रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात या विषाणूची बाधा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या पार्श्वभूमिवर गुरूवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात आठ नवीन कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात खिर्डी येथील दोन तर पुरी-गोलवाडे, केर्हाळा, वाघोदा, तामसवाडी, नेहता व कोळोदा येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश असून महसूल प्रशासनाने याला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, या रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांचा रहिवास असणार्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करून त्या भागात फवारणीसह अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत.