रावेर तालुक्यातील महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांची यादी प्राप्त

 

रावेर, प्रतिनिधी। महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी रावेर तालुक्यातील ४ हजार ५७९ लाभार्थांची यादी प्राप्त झालेली आहे.या सर्व याद्या संबधीत गावच्या तलाठी चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार असून पात्र शेतक-यांनी आधार प्रणालित करण्याचे अवाहन तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे

शेतकऱ्यांना अवाहन करण्यात आले आहे की, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत रावेर तालुक्यात ४ हजार ५७९ शेतक-यांची याद्या प्राप्त झाले आहे. यामध्ये अपात्र २९३ शेतकऱ्यांपैकी आधार प्रमाणिकरण झालेले १७२ लाभार्थी आहे. आता ग्रामपंचायत निवडणूकीमुळे प्रसिध्दी न केलेल्या नऊ गावच्या ४३६ शेतक-यांची निवडणूक असल्याने ग्रामपंचायतीच्या सिमेलगतचे गावे आंदलवाडी, दसनुर, मस्कावद बु ,सावदा, सुनोदा वाघोदा बु, वाघोदा खु, उदळी,थोरगव्हाण अशी नऊ गावे वगळुन उर्वरीत गावामध्ये शेतक-यांच्या यादया या ग्रामपंचायत,तलाठी यांच्या चावडीवर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी १७२ कर्जखाते यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे. तरी उर्वरित यादीमधील शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जावुन एमजेपीएसकेवाय या पोर्टलवर आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे जेणे कडून शेतक-यांना योजनेचा लाभ देणे सोईस्कर होईल असे महसूल विभागा तर्फे कळविले आहे.

Protected Content