रावेर, प्रतिनिधी । रावेर तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करुन समर्पण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, डॉ विजय धांडे, जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी मार्गदर्शन केले.तालुका सरचिटणिस महेश चौधरी, सुनिल पाटिल, गोपाळ नेमाडे, सौ.माधुरी नेमाडे, सौ..अनिता चौधरी, सौ. कविता कोळी, मनोज श्रावग यांचेसह जि.प. व प.स. सदस्य व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन महेश चौधरी यांनी केले.