रावेर प्रतिनिधी । आमदार शिरिषदादा चौधरी यांचा दि १८ रोजी रावेर तहसिल कार्यालयात जनता दरबार आयोजीत करण्यात आला असुन जनतेच्या काही तक्रारी असल्यास उपस्थित राहण्याचे अवाहन रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले.
याबाबत वृत्त असे की, येणाऱ्या १८ फेब्रुवार मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता रावेर तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आला असून रावेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास उपस्थित राहण्याचे अवाहन रावेरच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी केले. या दरबारात प्रशासनाचे सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे.