रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्याला शासनाने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व तलाठ्यानी महसूल वाढीसाठी प्रर्यत्न करावे येणाऱ्या ३१ मार्चच्या आधी शासनाने दिलेले उद्दीष्ट पूर्ण करावे शेतसारा नजराने बाकी असणाऱ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी दिले आहे.
रावेर तहसील कार्यालयात प्रांतधिकारी कैलास कडलक यांच्या प्रमुख उपस्थित महसूल वसूली संदर्भात महत्वाची बैठक पार पडली यावेळी तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे देखिल उपस्थित होते. यावेळी शासनाने रावेर तालुक्याला दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व तलाठ्यांना कामाला लागण्याच्या सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या. रावेर तालुक्याला शासना कडून दहा कोटी रूपयांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यावेळी बैठकीला निवासी नायब तहसिलदार सी.जी. पवार तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी सर्व तलाठी उपस्थित होते.