रावेर ग्रामीण रुग्णालयात कोवीड रुग्ण बरे होण्याचा आलेख उंचावला

 

रावेर : प्रतिनिधी। येथील ग्रामीण रुग्णालयातील कोवीड ऑक्सिजन बेडमुळे रुग्ण समाधानी आहेत दररोज नव्याने रुग्ण दाखल होत असले तरी आव्हान स्विकारण्याच्या मानसिकतेने वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सहकारी मेहनत घेत आहेत .

ग्रामीण रुग्णलयाचे वैदयकीय आधिकारी डाँ. एन. डी. महाजन आणि सर्व डॉक्टर स्वतः कोवीड रूणांची देखरेख करतात औषधोपचार शासनाने ठरवून दिलेल्या मात्रेत देताना ऑक्सीजन, विटामिन सी,डी, झिंक, गरज असेल तर रेमडेसिर्विर , कोमट पाणी देण्यात येते . येथील जेवणाचा दर्जा चांगला आहे आतापर्यत 200 दाखल करण्यात आले आहेत .
लोकप्रतिनिधीनी ग्रामीण रुग्णलयामध्ये व्हेटिलेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे,

वैदयकीय आधिकारी डाँ. एन. डी. महाजन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा कोरोनावीर म्हणू यथोचित सन्मान सरकारने करावा अशी भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली .
ग्रामीण रुग्णालयात जुलै महिन्यापासुन dche सेंटर सुरु असून यात मध्यम, गंभीर तसेच गंभीर कोरोनाचे रुग्ण अँडमीट केले जात आहेत . आतापर्यत जवळजवळ 200 पेशंट दाखल करण्यात आले त्यापैकी 118 पेशंट बरे होवून घरी गेले आहे, सध्या एकून 18 पेशट उपचार घेत आहें, गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे ,डाँ. एन. डी. महाजन यांनी सांगितले .

Protected Content