रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा रावेर तालुक्याचा दौरा होता. आज रावेर कोवीड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील समाधाकारक असुन कोविड सेंटरवर देखिल चांगली सुविधा मिळत आहे. नागरिकांनी देखिल सर्दी खोकला तापाचे लक्षणे जाणवल्यास तात्काळ कोविड सेंटरला तपासुन घ्या, कोरोना बाबत तालुक्यात सर्व ‘ऑल इज वेल’ असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आज रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते पत्रकारांशी बोलताना पुढे ते म्हणाले की रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरचा लाभ देखिल रुग्णाना मिळणार आहे जिल्हात काल साडे सात हजार लोक कोरोना व्हायरस पासुन बरे होऊन त्यांना डिर्चाज मिळाला असून कोणत्याही रुग्णानी घाबरू नये असे आवहान देखिल जिल्हाधिकारी श्री राऊत यांनी केले आहेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सावदा येथे कंटरमेंट झोन, विवरे ख़ुर्द, रावेर कोविड सेंटरची पाहणी, रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरची पाहणी दरम्यान आमदार शिरीषदादा चौधरी, प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, नगर पालिकेत रविंद्र लांडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक आदि उपस्थित होते.
मका खरेदीची मुदतवाढ मिळण्याची शक्यता
तालुक्यात मक्याचे उत्पादन बघता खरेदी करण्याची तारीख वाढण्यासाठी शासनाकडे पाठपूरा करणार बंद असलेले कापुस खरेदी केंद्रांबाबत देखिल माहिती घेऊन खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठपूरावा करणार कापुस खरेदी बाबत जिनिंगची असलेली तांत्रिक बाबी सोडवणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्याने कापुस मका उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना बाधितांची अपडेट
रावेर तालुक्यात कोरोना पोझिटीव्ह रुग्ण 696 असून यापैकी 493 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे तर 45 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यु झालेला आहे.