रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा देत महाविकास आघाडी तर्फे शासनाच्या निषेध करीत रावेर शहरात पन्नास खोक्यांची होळीचे दहन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांनी राज्यशासनाच्या धोरणांवर सडकुन टीका केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरात महाविकास आघाडी तर्फे पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देत भाजपा व शिंदे गटाच्या सरकारचे निषेध केला यावेळी.माजी आमदार पाटील यांनी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्यसरकारवर सडकुन टीका केली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कॉग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गट अध्यक्ष योगराज पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, गोटू शेट, माजी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, संतोष महाजन सुरेश शिंदे, गयासुद्दीन काझी, अशोक गनवाणी, सोपान पाटील, योगेश पाटील, सचिन पाटील, राहुल महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.