रावेर प्रतिनिधी । शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात “दुध बंद एल्गार आंदोलन” करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे तहसिलदार यांनी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीलिटर १० रुपये अनुदान द्यावे, निर्यात करण्यात येणाऱ्या दुध भुकटी प्रती किलो मागे ५० रूपये अनुदान द्यावे, केळी पिक विम्यात ज्या जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत, त्या रद्द करण्यात याव्या, शेतकऱ्यांच्या कापुस, मका शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खते उपलब्ध करून द्यावी इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे
यांची होती उपस्थिती
यावेळी आंदोलनात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी पं.स. उपसभापती सुनिल पाटील, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, पं.स. सदस्या योगिता वानखेडे, पी.के. महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, दिलीप पाटील, संदीप सावळे, विशाल पाटील, नितिन पाटील आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.