रावेर प्रतिनिधी । शहरातील मदिना कॉलनी परसरातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून साडेपाच हजार रूपयांचा मुद्देमालाचा किराणा चोरून नेला. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील मदीना कॉलनीतील शाहरूख खाना यांचे किराणा दुकान आहे. ८ जुलै रोजीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत दुकानातील जीवनाश्यक वस्तू असा एकुण साडे पाच हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. यात ४५० रुपये किमतीचे पॅराशुट तेल, ३०० रुपयाचे व्हिल साबन, १५० कीमतीचे बिस्किट, १२०० रुपयाचे बीडी, १५० रुपयाचा शेव-चिवडा, १०० रुपये कीमतीचा आम-आचार, ७० रुपयाचा आग्रा पेठा मिठाई, ३००० रोख असा ५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल लंपास झालाय. शाहरूख खान यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्र सूरवाडे करीत आहे