रावेरात कर्नाटका पोलिसांनी घेतले परराज्यातील व्यापाऱ्यास ताब्यात

 

रावेर, प्रतिनिधी । कर्नाटका पोलिसांनी रावेरतून एका मक्याच्या व्यापा-याला ३७ लाखाच्या चेक बाउंस प्रकरणी अटक केली आहे. तालुक्यातील शेतक-यांनी आपला माल परराज्याच्या व्यापा-यांना देतांना काळजी घेण्याचे अवाहन पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे.

याबाबत वृत्त असे की, मुळचा दारापुरम ( जि. तिरुपुर) तमिळनाडु येथील असलेला मक्याचा व्यापार करणारा आरोपी व्यापारी संथील कुमार हा मागील महीना भरापासुन  मका खरेदीसाठी रावेर तालुक्यात आला होता. या व्यापा-या विरुध्द कर्नाटकात तब्बल ३७ लाखाचा मका प्रकरणी चेक बाउंसची केस होती. आज पोलिस मंदार पाटील यांच्या मदतीने कर्नाटक पोलिसांनी थेट रावेर गाठुन त्याला लॉजवरुन अटक करून कर्नाटक पोलिस घेऊन गेले आहे.

 

 

 

 

Protected Content