रावेर, प्रतिनिधी । शिवभोजन थाळी राज्य सरकारची एक महत्वकांक्षी योजना या अंतर्गत रावेर तालुक्यातील गरीब,निराधार, हातावर पोट असणा-या कुटुंबांतील सुमारे १८ हजार जणांनी फक्त पाच रुपये देवून शिवथाळीवर ताव मारला आहे.
कोणीही उपाशीपोटी झोपता कामा नये म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही योजना दोन वेळेस जेवण्याची भ्रांत असलेल्या गरीब व्यक्तीसांठी आणली आहे. येथे दरोरोज शंभर व्यक्तीना पोटभर जेवण देण्याची जबाबदारी येथील केंद्र प्रमुखांची आहे. येथे आलेले अनेक महिला सांगता हाताला काम नसल्याने जवळ पैसे नसतात परंतु येथे पाच रूपयात जेवण मिळत असल्याचा आम्हाला समाधन असल्याचे मत मांडले आहे. कोरोना काळात सुरु झालेली शिवभोजन केंद्र योजना रावेर व सावद्यात १ मे पासुन सुरु झाली आहे. दोन्ही केंद्रावर आता पर्यंत १८ महिला,पुरूष,मूली,मुलांनी ताव मारला आहे.
फक्त पाच रूपयात भाजी,वरण,भात,चपाती
फक्त पाच रूपयात दरोरोज ३० ग्राम वजनाची चपाती १०० ग्राम भाजी, १०० ग्राम वरण तर १५० ग्राम दर्जेदार भाजी देण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांची आहे. तसेच जेवण दर्जेदार आहे किंवा नाही यासाठी अचानक पणे येथील पुरवठा अधिकारी हर्षल पाटील पाहणी करतात
कोरोना बाधितांना १४० तर गरीबांना ३० रुपये अनुदान देते शासन
प्रत्येक लाभार्थांन कडून पाच रुपये तर तीस रुपये अनुदान शासन असे ३५ रुपये शिवभोजन केंद्र प्रमुखाना मिळतात जेव्हा हेच शिवभोजन थाळी सोबत चहा,पोहा आणि एका केळासह कोविड सेंटरला पोहचते तेव्हा याची किंमत 145 रुपये होते. रावेर येथील शिवभोजन केंद्र प्रमुख सांगता की मागिला महिन्यात तर एका दात्याने पाच रुपये प्रमाणे तब्बल पंधरा हजार देऊन महीनाभर फ्री जेवण पुरवण्याचे सांगितले होते असे देखिल लोक शिवथाळीला हातभार लावतात.फक्त ही रक्कम पुन्हा वसूल करू नये म्हणजे झाले. दरम्यान, पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी कोरोना काळात सुरु झालेले शिवभोजन केंद्र अनेक गरीब व्यक्तीचे पोटभरत आहे. केंद्रावर स्वच्छता रहावी म्हणून मी स्वतःच बऱ्याच वेळा पाहणी करतो. सावदा व रावेर दोघेही केंद्र प्रमुखाना सूचना आहे की आपल्या केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला चवदार व स्वादिष्ट जेवण द्यावे. गरिब निराधार व्यक्तीला केंद्रावर जेवण करतांना बघुन खुप समाधान वाटते असे मत व्यक्त केले आहे.